मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

0
49

भंडारा,दि.11:- सध्या राज्यामध्ये कोविड 19 या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधनाची तीव्र कमतरता जाणवत आहे. यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थ केअर सेक्टर स्कील कौन्सील ‘मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, वैद्यकीय प्रशिक्षण संस्था, आयुर्वेदिक महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय ज्यांची 20 पेक्षा अधिक बेड्स असे खाजगी रुग्णालय अशा इस्पितळांचे ग्रीन चॅनलव्दारे व्यावसायीक प्रशिक्षण संस्था (व्हीटीआय) म्हणून नोंदणी करुन जॉब ऑन ट्रेनिंग पद्धतीने बेरोजगार उमेदवारांना आरोग्य व नर्सिंग क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार ह्या क्षेत्रात आधिच काम करत आहे. परंतू त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कौशल्य प्रमाणपत्र नाही. त्यांना आरपीएल अंतर्गत प्रमाणपत्र प्रदान करावयाचे आहे. आरोग्य क्षेत्रातील 36 प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना रुग्णालयामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होईल. भंडारा शहरातील तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार गरजू इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी दिली.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता https://forms.gle/A3kanuX8avazPExk8 या लिंकचा उपयोग करावा.  तसेच सदर लिंक भंडारा स्किल या फेसबुक पेजवर सुध्दा उपलब्ध आहे. या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील सर्व प्रवर्गातील युवक युवतींकरिता आरोग्य क्षेत्रात नि:शुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. प्रशिक्षण भंडारा जिल्ह्यातील शासकीय किंवा खाजगी रुग्णालय मार्फत देण्यात येईल. ऑफलाईन पध्दतीने इच्छुक उमेदवार या कार्यालयाकडे देखील अर्ज करु शकतात. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वर्ग 4 थी ते पुढे दहावी, बारावी, पदवीधर आहे. उमेदवारांना प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर शासनातर्फे प्रमाणपत्र देखील देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल बस स्टॅन्ड जवळ भंडारा दुरध्वनी क्रमांक 07184-252250 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000