
गोंदिया,दि.11 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 11 जून रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 22 कोरोना पॉझिटिव्ह
रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित एका
रुग्णाचा उपचारादरत्यान मृत्यू झाला.
आजपर्यंत 41,020 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,064 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली
आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 259 आहे. 193 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण
घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 697 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण
आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.61 टक्के आहे तर डब्लिंग रेट 294.8
दिवस आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना
विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 176754 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 150976 नमुने निगेटिव्ह आले तर
21404 नमुने पॉझिटिव्ह आले. 777 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत
178588 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 157666 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 20922 व्यक्तींचे
अहवाल पॉझिटिव्ह आढळले. कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. ज्या रूग्णांना
काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
भंडारा जिल्ह्यात आज 90 रुग्णांना डिस्चार्ज,कोरोना पॉझिटिव्ह 24
भंडारा, दि.11 – जिल्ह्यात आज 90 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 57800 झाली असून आज 24 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59256 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के आहे.आज 1621 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 24 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 04 लाख 02 हजार 119 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59256 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 07, मोहाडी 03, तुमसर 02, पवनी 04, लाखनी 01, साकोली 03 व लाखांदुर तालुक्यातील 04 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 57800 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59256 झाली असून 401 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1055 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.78 टक्के एवढा आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी ५९ कोरोना बाधित; ९७ जणांना डिस्चार्ज=एकूण पॉझिटिव्ह – ४०९६०,ऍक्टिव्ह – ७३५,डिस्चार्ज – ३९६२७,मृत्यू – ५९७,जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची, तसेच आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे.





