35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home शैक्षणिक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग उपाध्यक्षपदी प्रशांत बुरांडे व नीलेश शृंगारे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग उपाध्यक्षपदी प्रशांत बुरांडे व नीलेश शृंगारे

0
36

blank

यवतमाळ-यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या अनेक शिक्षकांनी यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष डॉ. सतपाल सोवळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत प्रवेश घेतला. शनिवारी संघटनेच्या गुगल मिटिंगद्वारे प्रशांत बुर्‍हाडे, श्रीकांत उपाध्ये, प्रगती देशकरी, शीतल खडगे, शरद बनसोड, बंडू कुमरे, संजय आत्राम, सुभाष महाजन, भारत निखाडे यांना संघटनेत प्रवेश देण्यात आला.

प्राथमिक विभाग सोबत माध्यमिक शिक्षकांच्यासुद्धा प्रलंबित समस्या सोडविण्यास शिक्षक परिषद नेहमीच कटिबद्ध राहील. त्यांच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. सतपाल सोवळे यांनी सर्व शिक्षकांना दिले. संघटनेचा विस्तार लक्षात घेऊन माध्यमिक शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत बुरांडे यांना तसेच परिषदेचे निष्ठावान कार्यकर्ते, उपक्रमशील शिक्षक महागावचे नीलेश शृंगारे यांना जिल्हा उपाध्यक्षपदाचे दायित्व याप्रसंगी देण्यात आले. या गूगल मिटिंगमध्ये राज्य उपाध्यक्ष डॉ. सतपाल सोवळे, जिल्हाध्यक्ष अवधूत वानखडे, कार्यवाह गजू पोयाम, कार्याध्यक्ष दर्पण माळवी, अमरावती विभाग कार्यवाह नरेश खडतरे, यांच्यासह महिला आघाडीप्रमुख प्रेरणा तंबाखे व इतर शिक्षक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अवधूत वानखेडे यांनी, तर आभारप्रदर्शन सुनील वाटेकर यांनी केले.

blank