34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ राज ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त मनसे सालेकसाच्या वतीने स्वस्त पेट्रोल आणि डिजलचे वितरण

राज ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त मनसे सालेकसाच्या वतीने स्वस्त पेट्रोल आणि डिजलचे वितरण

0
27

blank

सालेकसा-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सालेकसा यांच्यावतीने तालुक्यातील नागरिकांना दहा रुपये सूट देत पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्यात आले. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या चुकीचा अर्थ धोरणामुळे वाढीव पेट्रोल आणि डिझेल च्या दरामुळे नागरिकांना भुर्दंड बसत आहे, याचा निषेध नोंदवत राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलवर दहा रुपयांची सूट देत आगळेवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष उषा कुरंजेकर व मनसे तालुका सचिव अमित अग्रवाल यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात आले. सत्ते पासून दूर असून जर मनसे ला नागरिकांना स्वस्त पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देता येत असेल तर शासनाला का नाही असा प्रश्न निर्माण करत केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्यावर टीकास्त्र सोडत उषा कुरंजेकर यांनी निषेध व्यक्त केला. तालुक्यातील नागरिकांना नेहमीच मदतीचा हात म्हणून मनसे सदैव तत्पर राहील, असे विधान तालुका सचिव अमित अग्रवाल यांनी व्यक्त केले. तर राज ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी तालुकाध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी भावना व्यक्त केले. यावेळी तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, तालुका उपाध्यक्ष दिलीप ढेकवार, तालुका उपाध्यक्ष अभय कुरंजेकर, तालुका उपाध्यक्ष ध्रुवकुमार हूकरे, तालुका सचिव अमित अग्रवाल, शहर अध्यक्ष राहुल हटवार, शहर उपाध्यक्ष गोल्डी भाटिया, काहली शाखा अध्यक्ष उद्देश शहारे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मयुर पाथोडे, आमगाव खुर्द विभाग अध्यक्ष राजेश डोये व   मोहित फुंडे, हितेश चूटे , तरुण मेढे,   उपस्थित होते.

blank