34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता अंकिता जळीत हत्याकांड प्रकरणी २ साक्षीदारांच्या उलट तपासणी

अंकिता जळीत हत्याकांड प्रकरणी २ साक्षीदारांच्या उलट तपासणी

0
81

blank

हिंगणघाट,दि.:18- अंकिता जळीत कांड प्रकरणात न्यायालयाने बचाव पक्षाचा अर्ज मंजुर करुन दोन साक्षिदारांना उलट तपासणी साठी हजर राहण्याचा आदेश दिला.आता २८ जुनला हे साक्षिदार न्यायालयात हजर होतील.
अंकिता जळीत कांड प्रकरणात साक्षी चे काम पुर्ण झालेले असतांनाच बचाव पक्षाने साक्षिदार क्रमांक २७ व २८ यांना फेर तपासणीसाठी हजर करण्याची न्यायालयाला अनुमती मागीतली होती.प्रत्यक्षात १७ जुन ही या प्रकरणाची तारीख असतांनाच फिर्यादी पक्षाने १६ तारखेलाच हे प्रकरण बोर्डावर घेऊन बचाव पक्षाच्या अर्जाला मान्यता दिली.त्यानुसार आज न्यायालयाने बचाव पक्षाच्या अर्जाला मंजुरी दिल्याने आता २८ जुनला बचाव पक्षातर्फे दोन नोडल अधिकार्‍यांची प्रत्यक्ष फेर उलटतपासणी होईल.कोरोनाचे संक्रमण आता कमी झाल्याने या नंतरचे न्यायालयाचे कामकाज व्हिडिओ काँफरंसिंगने न होता प्रत्यक्ष उपस्थितीने होईल.

blank