42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय धान उचल न करणाऱ्या मिलर्स वर कारवाई करा : खा.सुनील मेंढे

धान उचल न करणाऱ्या मिलर्स वर कारवाई करा : खा.सुनील मेंढे

0
55

blank

गोंदिया :  जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांना घेऊन गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनील मेंढे यांनी आढावा बैठक घेतली. धानाची भरडाई करण्यासाठी उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विषयांना घेऊन झालेल्या बैठकीत विशेष करून धानाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करताना खरीप हंगामातील खरेदी होऊन उचल न झालेला जवळपास 30 लाख क्विंटल धान अजूनही पडला आहे. तो तातडीने उचलला जावा व भरडाई व्हावी या दृष्टीने ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जे राईस मिलर्स काम करणार नाही अशांना नोटीस देऊन काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. अनेक वर्षांपासून तयार होऊन असलेल्या गोंदिया विमानतळावरून एकही उडान अजून पर्यंत झाली नाही. काही कारणाने येथून होणारी प्रवाशी वाहतूक सुरू होऊ शकत नसल्याने विमानतळाच्या संदर्भात परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा असलेल्या प्रश्न तात्काळ निकाली काढावा व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या घरांची व्यवस्था लवकरात लवकर करावी असे आदेश खासदारांनी दिले. ग्रामपंचायत, खंडविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर वेगाने हालचाली करण्याच्या सूचनाही दिल्या.
आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उपाय योजना संदर्भात आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील 30 पेक्षा अधिक गावे प्रभावित झाली होती. त्यामुळे यावेळी ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे अशा सूचना खासदारांनी केल्या.
कोरोना लसीकरणा संदर्भात या वेळी आढावा घेताना 21 जून पासून सुरू होणार्‍या 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी. प्रत्येकाचे लसीकरण व्हावे यासाठी जनजागृती करावी असे सांगतानाच 45 वर्षावरील नागरिक सुद्धा लसीकरणा पासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार संजय पुराम, लोकसभा संघटन मंत्री बाळा अंजनकर, महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेम्बरे, गजेंद्र फुंडे, ओम कटरे, जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पणन अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी वंदना सारंगपते, विमानतळ संचालक विनय ताम्रकार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेश चौबे आदी उपस्थित होते.

blank