
– नगरातील विकास कामांचा मार्ग सूकर
अर्जुनी मोर,दि.20ः-वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी दोन वर्षापुर्वी मंजूर 5 कोटींचा निधी तत्कालीन नगरसेवकांच्या कामचुकार तथा प्रशासकीय अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रखडून होता. 15 जून रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गोंदिया जिल्हा दौर्यावर असताना शिवसेनेतर्फे निवेदन देऊन निधी नगरपंचायतीला हस्तांतरण करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी सामंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क करून निधी हस्तांतरण करण्याचे निर्देश दिले. गुरूवार 17 जून रोजी स्थानिक नगर पंचायतीकडे 5 कोटी 98 हजार 448 रुपयांचा निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे. या निधितून नगर विकास कामांचा मार्ग सूकर होणार असल्याचे बोलले जाते.
नगरवासीयांनी चुकविलेला कर व शासनाकडून मिळणार्या निधीच्या माध्यमातुन नगरात विविध विकास कामे व योजना राबविल्या जातात. निधि अभावी नगरातील विविध विकास कामे व योजना रखडून होत्या. यामुळे नगरपंचायतीवर नगरवासीयांचा तिव्र रोष व्याप्त होता. अनेकदा पदाध्किारी व अधिकारी यांना या रोषाला सामोरे जावे लागायचे. शहरातील विकास कामाना चालना मिळावी, नगरातील रखडलेले कार्य पूर्णत्वास यावे यासाठी मागील वर्षापासून नेत्यांना साखळे घालणे सुरु होते. अधिकारी, मंत्र्यांन निवेदने देण्यात आली. मात्र कोणत्याही नेत्याला यात यश आले नाही. शिवसेना तालुका कार्यकारिणीतर्फे नगरविकास मंत्री एकनाथ शिंंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना 5 कोटिंचा निधि हस्तांतर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. ते गोंदिया जिल्हा दौर्यावर असतांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या भ्रमन्ध्वनीवर संपर्क करून त्वरित निधि नगरपंचायतला हस्तांतर करण्याचे निर्देश दिले. गुरूवारी 5 कोटी 98 हजार 448 रुपयांचा निधि हस्तांतर करण्यात आला. मिळालेल्या निधितून शहर विकासाची वाट मोकळी झाली आहे. निधी मिळवून दिल्याबद्दल उपजिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल, जिल्हा सचिव संजयसिंह पवार, महिला उपसंघटिका ममता पवार, तालुका प्रमुख चेतन दहिकर, युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम, शहर प्रमुख प्रकाश उईके, अरुण मांडवगने, यादव कुंभरे यांच्यासह नगरवासीयांनी सामंत यांचे आभार व्यक्त केले आहे.





