
गोंदिया,दि.22ःः तालुक्यातील खमारी येथील माहेश्वरी साँल्वंट प्लांटमध्ये कामावर असलेल्या कामगारांनी आपल्या थकीत वेतनासह इतर मागण्यांना घेऊन सोमवारपासून आमरण उपोषण आंदोलनाला सुरवात केली आहे.हे आंदोलन राष्ट्रीय केमीकल संघटनेचे संपतराव वाढई यांच्या नेतृत्वात विनोद पडोले यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आले आहे.आंदोलक कामगारांना गेल्यावर्षी लागलेल्या लाँकडाऊनमध्ये बंद करण्यात आले,तेव्हापासून त्यांना कुठलेही वेतन देण्यात आले नाही,तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम सुध्दा भरण्यात न आल्याने हे आंदोलन सुरु करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे.जवळपास 50 कामगारांचे थकीत वेतन मिळावे,भविष्य निर्वाहनिधीसह सर्व हिशोब मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असे आंदोलकांचे म्हणने आहे. आंदोलनात धनंजय शिवणकर,धनराज भांडारकर,होलूराम सव्वालाखे,ओमेश कटरे,मुलचंद तुरकर,घनश्याम तिडके,लिखीराम मुनीश्वर,महेंद्र बडोले,संतोष बारापात्रे,अमर बारापात्रे,रंगलाल बोपचे,श्रावण टेंभरे,सुनिल बारापात्रे,नरेंद्र उके,नेवालाल काटेवार,अनिल ढोमणे,रामदास येरणे,महेंद्र येरणे,नरेंद्र येरणे,चनीराम बोपचे,चंदन बिसेन,ईश्वर तुरकर,राकेश मेश्राम,रमेश तवाडे,गोपाल भांडारकर,रविंद्र चुटे,कमलेश मानकर आदी कामगार सहभागी झाले असून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला आहे.





