
गोंदिया,दि.22 :-जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोविडच्या संकटामुळे नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती च्या निवडणुका थांबलेल्या असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांची आढावा बैठक सभा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी (दि.23जून )सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे महासचिव कुशलभाऊ मेश्राम, विदर्भ समन्वयक तथा निवडणूक निरीक्षक राजूभाऊ झोडे, अरविंद संदेकर,,प्रा.के. एन.नान्हे,डॉक्टर रमेश गजबे,रवीभाऊ शेंडे,राहुलभाऊ वानखेडे आदी पदाधिकारी राहणार आहेत.या सभेत ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे मोलाचे मार्गदर्शन जिल्ह्यातील बहुजन समाजातील वंचित घटकंना मिळणार आहे. त्या निमित्त जिल्यातील अनेक वंचित घटकातील समुहणा वेळेवर उपस्थित राहून त्यांच्या अनेक समस्यावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे त्यासंबधी इतर सामाजिक समस्यांचेही अवलोकन करण्यात येणार आहे.महाराष्टा सहित देशाच्या राजकीय घडामोडीवर मार्गदर्शन करणारे राजकीय नेते आपल्या जिल्ह्यास भेट देत आहेत यावेळी सर्वच समाजातील जनतेला या सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ समन्वयक राज डाहाट, बाबा मेश्राम व जिल्हाध्यक्ष सतीश बनसोड यांनी केले आहे.





