
गोरेगाव:- कोव्हीड -१९ व्हायरसमुळे गोरेगाव तालुक्यातील खाडीपारटोला निवासी सुरजलाल मरसकोल्हे व त्यांची पत्नी सीमा मरसकोल्हे मरण पावल्यामुळे त्यांचे ४ वर्षे व ३ वर्षाची अशा दोन मुली अनाथ झाल्या याची दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी आज पिडीत मुलांची भेट घेऊन पालकत्व गमावलेल्या मुलांच्या वृद्ध आजीला आर्थिक मदत केली व सदर आदिवासी मुलांना शासनातर्फे मदत मिळण्याकरिताकार्यवाही करण्याबाबत आदिवासी प्रकल्प अधिकारी देवरी यांना आदेशित केले भेटीदरम्यान भाजप जिल्हा महामंत्री तथा माजी जी.प.उपाध्यक्ष मदन पटले, भाजप तिरोडा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,तिरोडा शहरअध्यक्ष स्वानंद पारधी,सरपंच दिनेश टेकाम,उपसरपंच यशवंत कावळे वरिष्ठ कार्यकर्ते नीलकंठ तुमसरे,शैलेश नंदेश्वर व गावातील नागरिक उपस्थित होते.





