
गोंदिया,दि.23ः जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या अनुशंगाने प्रत्येक अधिकाऱ्याकडे संघटनेमार्फत वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला असून सदर मागणीच्या अनुषंगाने त्या निर्णयाधिन राहून अनेक वर्षापासून रखडत चाललेल्या होत्या.
सदरील प्रलंबित मागण्यांबाबत तसेच कर्मचाऱ्यांचे अनेक विषयांच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी राजेश खवले यांना अवगत करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांचे प्रलंबित विषय तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार त्यांनी आपला शब्द पूर्ण करत महसूल सहाय्यक ते अव्वल कारकून या पदावर एकूण 14 पदोन्नत्या, शिपाई ते महसूल सहाय्यक पदावर एकूण 03 पदोन्नत्या याचबरोबर अनुकंपा भरती प्रक्रियेद्वारे 02vतलाठी 02 शिपाई व 01 महसूल सहाय्यक नियुक्त्या करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण महसूल विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने महसूल कर्मचारी संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी महोदय यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहे.
यावेळी राजेश मेनन अध्यक्ष, आशिष प्र. रामटेके सचिव, राकेश डोंगरे कार्याध्यक्ष, सुपचंद लिल्हारे कोषाध्यक्ष, मुकुंद तिवारी उपाध्यक्ष इत्यादी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.





