39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्हा माळी संघटनेचा जन आंदोलनास पाठींबा

जिल्हा माळी संघटनेचा जन आंदोलनास पाठींबा

0
25

blank

गडचिरोली, दि.23 –26 जुन रोजी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीदिनी आरक्षण हक्क कृती समिती, गडचिरोली तर्फे पुकारलेल्या आरक्षणाविषयी जन आंदोलनास जिल्हा माळी समाज संघटनेचा जाहीर पाठींबा आहे. नवेगाव येथे काल 22 जून रोजी पार पडलेल्या जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोलीच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी, एससी, एसटी, विजे, एनटी, एसबीसी इ. सर्व मागासवर्गीय बांधवांनी गडचिरोली येथील आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान निघणाऱ्या मोर्च्यास मोठ्या संख्येने हजर राहुन लढा यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

काल 22 जून रोजी नवेगाव येथे पार पडलेल्या जिल्हा माळी समाज संघटनेच्या विशेष सभेत जन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींचे विविध क्षेत्रात कमी केलेले आरक्षण पुर्ववत करावे, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधावे व 100% शिष्यवृत्ती लागु करावी, असंवैधानिक नाॅन क्रिमीलेअरची अट वगळावी, महाज्योती अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावी, ओबीसी मंत्रालयास स्वतंत्र सुसज्ज इमारत – भरपूर स्टाॅफ व विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन द्यावा, इ. मागण्यांबाबत निवेदन तयार करण्यात आले आहे.

blank