रेशनपासून कोहकावासी वंचित

0
31

गोंदिया : तालुक्यातील सेजगाव खुर्द ग्राम पंचायत अंतर्गत येणार्‍या कोहका येथील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराने रेशनपासून लाभार्थी वंचित राहत असल्याचा प्रकार उघडकीस आले असून या अन्यायाविरोधात लाभार्थ्यांनी आ.विजय रहांगडाले यांच्यासह सरपंच, तहसीलदार तसेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. मागील दीड वर्षांपासून रेशन लाभार्थ्यांना मोफत तसेच वेळेवर मिळावे, यासाठी शासनस्तरावर सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, काही रेशन विक्रेत्यांच्या अट्टाहासाने लाभार्थी रेशनपासून वंचित राहत असल्याचेही दिसून आले आहे. हाच प्रकार तालुक्यातील सेजगाव खुर्द ग्राम पंचायत अंतर्गत दिसून आला आहे. लाभार्थ्यांना वेळेवर रेशन न देणे, त्यांना मानसिक त्रास देणे असा प्रकार रेशन दुकानदारांकडून सुरू आहे. त्यामुळे हक्काच्या रेशनपासूनही गावातील अनेक नागरिक वंचित राहत आहेत. गावात रेशन दुकान लेकचंद महारू धुर्वे दुकान नं.२८ यांच्याकडे आहे. परंतु, यांच्याकडून होत असलेल्या अन्यायाला लाभार्थी बळी पडत आहेत. करीता रेशन दुकानदारावर कारवाई करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून कोहका ग्रामवासीयांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, सरपंच, तहसीलदार व आमदार रहांगडाले यांना देण्यात आले आहेत.