34.5 C
Gondiā
Wednesday, June 3, 2026
Home राजकीय भाजपचे आंदोलन म्हणजे पुतनामावशीचे प्रेम : कवाडे

भाजपचे आंदोलन म्हणजे पुतनामावशीचे प्रेम : कवाडे

0
44

गोंदिया- ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आपण व अनेक संघटनांनी संघर्ष केले. माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग सरकारने ओबीसीला न्याय दिला. दरम्यान या काळात याच भाजपाने ओबीसी आरक्षणाचा विरोध केला होता. परिणामी व्ही.पी.सिंग सरकाराला जावे लागले. मात्र त्याच भाजपला आता ओबीसी समाजाचा प्रेम उफाळून आला आहे. फडणविस सरकाराने गेल्या ५ वर्ष ओबीसी समाजासाठी काही केले नाही. म्हणून भाजपचे आंदोलन म्हणजेचे पुतना-मावशीचे प्रेम आहे, असा आरोपी पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोंगेंद्र कवाडे यांनी केला आहे.
पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे हे (ता.२८) पक्षांतर्गत बैठकीसाठी गोंदिया आले होते. दरम्यान प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होते. प्रा. कवाडे पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयापुढे ओबीसी समाज बांधवांची जनसंख्या मांडण्यात आली नाही. यामुळे न्यायालयाच्या आदेशाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. याला आमच्या मित्र पक्षाची महाविकास आघाडी जेवढी जबाबदार आहे, तेवढीच जबाबदार मागील फडणवीस सरकार देखील आहे. ज्या ओबीसींच्या आरक्षणाचे आजपयर्ंत ज्यांनी विरोध केला, तेच आता रस्त्यावर उतरून आंदोलनाचा सोंग करीत आहे,
एवढेच नव्हेतर भाजपचे नेते फडणवीस यांना आजही सत्तामोह आहे, त्यामुळेच ते माज्या हाती सत्ता आली तर ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करण्याची भाषा करीत आहेत हे आता ओबीसी समाज पचवून घेणार नाही.
ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करण्यात यावे तसेच महाविकास आघाडी सरकारनेही घेतलेला ओबीसी समाजाचा प्रशासकीय पदोन्नतीचा निर्णय मागे घेण्यात यावा या शिवाय देशात वाढती महागाई या सर्व प्रश्नांवर पिरिपा आगामी काळात आक्रामक भूमिका घेणार आहे, याकरिता नाशिक येथे पिरिपाची प्रादेशिक परिषद येत्या १७ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मुंबई व दिल्ली येथील आंदोलनाची रुपरेखा निश्‍चित केली जाणार आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, तो शासन निर्णय मागे घेण्यात यावा, महागाई कमी करण्यात यावी, अशी आमची प्रमुख मागणी राहणार आहे.
केंद्र सरकारावर ताशेर ओढतांना ते म्हणाले मोदी सरकाराचा ७ वषार्चा कार्यकाळ म्हणजे अघोषित आणीबाणी सारखा आहे.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या सरकारातील आणीबाणी तर सर्व सामान्यांच्या हिताची होती पण मोदी सरकाराची अघोषित आणीबाणी ही गरिबांना अडचणीत आणणारी आहे. यासाठी देखील भाजपने आंदोलन करावे, असाही टोला लगावला.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा अध्यक्ष राजकुमार भेलावे, महेंद्र नागदेवे, रामटेके, रियाज भाई, सुनिल भालाधरे, जय मेर्शाम, नागेश बडगे, लाला प्रजापती, सुरेश सतदेवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.