भंडारा जिल्ह्यात 03,गोंदिया 02 कोरोना पॉझिटिव्ह

0
64

गोंदिया,दि.29 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 29 जून रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 02 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत 41,122 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,381 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 41 आहे. 25 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 574 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.2 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.39 टक्के आहे तर डब्लिंग रेट 439.7 दिवस आहे.

जिल्ह्यात आज 06 रुग्णांना डिस्चार्ज,कोरोना पॉझिटिव्ह 03

भंडारा, दि.29:- जिल्ह्यात आज 06 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58298 झाली असून आज 03 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59475 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के आहे.आज 876 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 03 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 04 लाख 15 हजार 484 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59475 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 01, मोहाडी 00, तुमसर 02, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58298 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59475 झाली असून 49 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1128 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.90 टक्के एवढा आहे.