
नांदेड,दि.30ः. ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर मोरे तसेच येथील सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सिडको ग्रामीण पो. स्टे. चा पदभार स्वीकारल्या नंतर सिडको हडको तील अनेक प्रकारे गुन्हेगारी ला आळा बसावा म्हणून व गुन्हेगारावर जरब बसावा म्हणून. श्री. घोरबांड यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत, सिडको शहरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा या साठी सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन. शांतता प्रस्थापित करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या अल्पावधीत कार्यकाळात त्यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळात अनेक महापुरुषांची जयंती उत्सव सण साजरा करतांना सार्वजनिक ठिकाणी न करता सर्व जाती धर्मातील सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करून महापुरुषांची जयंती उत्स्फूर्तपणे आपआपल्या घरीच प्रत्येक कुटुंबियांनी साजरी करावी असे अवाहन केले. त्याच प्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी होणाऱ्या लोकांची संख्या अधिक वाढल्या मुळे सिडको येथील वैकुटंधाम स्मशानभूमीत अंत्यविधी संस्कार करत असताना तेथील.लगत राहणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शविला व त्या नागरिकांना उत्कृष्ट समुपदेशन करून चर्चे अंती सर्व नागरिकांची मिटिंग घेऊन तेथे शांतता प्रस्थापित केली. तसेच सिडको – हडको येथील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना नांदेड मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहायाने अतिक्रमण काढून व्यापारी बांधवाना शिस्त लावण्याचे काम केले. कोरोना महामारी च्या काळात, नांदेड सह परभणी, हिंगोली, व यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. तसेच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत, ”नागरिक तेथे पोलीस बिट मार्शल” ही अनोखी योजना आखली अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम व जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण कार्य करून.त्याच बरोबर अनेक गुन्हेगारी चा उत्तम छडा लाऊन तसेच अनेक गंभीर गुन्ह्याचा ताबडतोब तपास करून. एक प्रकारे सामन्य जनतेत,पोलीसा प्रतीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा एका कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन, सामाजिक बांधिलकी जोपासत व पोलीस बांधवांना निःपक्षपाती पणे काम करता यावे व समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून. सिडको – वाघाळा काँग्रेस ब्लॉक कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद
कांचनगिरे यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस स्टेशन येथे
अशोक घोरबांड यांचा शाल, व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी सिडको – हडको तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या संरक्षणासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व तसेच पोलीस बांधवाच्या वतीने जे काही समाजातील तरुणां मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, व्यसनमुक्ती जनजागृती, व अनेक सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन करूया अशी भावना व्यक्त केली. या वेळी सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, अल्पसंख्याक आघाडी चे अध्यक्ष शेख अस्लम, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विश्वनाथ शिंदे, देविदास कदम, एस. पी. कुंभार, भुजंग स्वामी, पत्रकार बापूसाहेब पाटील, कामेश भुरे, प्रा. शशिकांत हाटकर ई सह पोलीस कर्मचारी बांधव उपस्थित होते.