33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home मराठवाडा/खान्देश सहकारी मंत्री पाटील यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

सहकारी मंत्री पाटील यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

0
26

blank

लातूर,दि.१६- नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक व बूट वितरीत करण्यात आले. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहताना आनंद होत आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती, गट विकास अधिकारी संतोष माने, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सूरज पाटील, गट शिक्षणाधिकारी बबन ढोकाडे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक उपस्थित होते.

blank