१५ दिवसात होणार अनुकंपाधारकांची नियुक्ती

0
57

भंडारा-अनुकंपा धारकांच्या नियुक्त्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. अनुकंपाधारकांनी आपल्या व्यथा आमदार डॉ. परिणय फुके यांचेकडे निवेदन देऊन मांडल्या. डॉ. फुके यांनी जि.प. सिईओ विजय मून यांचे कार्यालयात अनुकंपाधारकांसह धडकले. त्यानंतर अनुकंपाधारकांना १५ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करून ३१ जुलैपयर्ंत नियुक्तीचे आदेश देणार, असे जिल्हा परिषद सिईओ यांनी सांगितले.
जिल्हा परिषद भंडारा येथील मृत कर्मचार्‍यांचे वारसान हक्काचे अनुकंपाधारक आहेत. सन २0१८ पासून जिल्हा परिषदने अनुकंपा धारकांची भरती केलेली नाही. त्यामुळे अनुकंपा धारक काही महिन्यातच वयाची ४५ वर्ष र्मयादा ओलांडणार आहेत. ३0 जुलै २0२0 च्या शासन निर्णयानुसार व ५ फेब्रुवारी २0२0 च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसाच्या आत अनुकंपा भरती प्रक्रिया पूर्ण करून शासनास अहवाल सादर करायचे होते. परंतु जिल्हा परिषदेने वर्षभर कालावधी लोटून सुद्धा भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भरती प्रक्रिया पार पडली. मात्र १४ ते १५ वर्षापासून अनुकंपा धारक नोकरीच्या प्रतीक्षेत होते.
अनेक अनुकंपाधारकांचे वय ४५ झाले असल्याने भरती प्रक्रियेतून बाद होण्याच्या मार्गावर आहेत. अनुकंपाधारकांनी पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा परिषद प्रशासन यांनी यांनी अनुकंपा धारकांना न्याय दिला नाही. त्यामुळे अनुकंपा धारकांनी अनेकदा आंदोलने केली.
भंडारा जिल्हा परिषदमध्ये प्रलंबित असलेलेली प्रक्रिया पूर्ण झाली तर वयाची कालावधी लक्षात घेता व निवेदनाची दखल घेत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी अनुकंपा धारकांच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुन व अतिरिक्त कार्यपालन अधिकारी सचिन पांनझाडे यांचे उपस्थितीत अनुकंपा धारकांना १५ दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करून ३१ जुलै २0२१ पयर्ंत नियुक्तीचे आदेश देणार असे जिल्हा परिषद सिईओ सांगितले. त्यामुळे लवकरच अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होणार आहे.
यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, बाळा अंजनकर, निशिकांत इलमे, चैतन्य उमाळकर, तिलक वैद्य , कोमल गभने, मनोहर खरोले, उमेश मोहतुरे , बबलू आतिलकर, धनंजय घाटबांधे, देवेश नवखरे,संदीप नागदेवे, दिवाकर मने, संदीप भांडारकर व अनुकंपा धारक उपस्थित होते.