आठ दुचाकींसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
33

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता
उमरखेड-आठ दुचाकींसह दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून, या आरोपींना ताब्यात घेतल्याने अनेक दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. ईश्वर शिवदास बन (रा. ग्राम शिरड, ता. हदगाव, जि. नांदेड) व मंगेश दिगंबर गिरी, रा. बेलखेड ता. उमरखेड, जि. यवतमाळ याच्या ताब्यातून चोरी केलेल्या 8 मोटर सायकल अंदाजे किंमत 4,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या मोटरसायकल त्यांनी जिल्हा औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली येथून चोरल्याची तपासादरम्यान समोर आले आहे. या आरोपींना पोलिस ठाणे पोफाळी येथील अप. क‘. 17/2018 मध्ये अटक करण्यात आले असून, आरोपीकडून अजून चोरीच्या मोटार सायकल मिळण्याची दाट शक्यता आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, पोफाळीचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत, पोलिस अंमलदार पंकज पातुरकर, सुधीर पिदुरकर, मोहंमद ताज, किशोर झेंडेकर, शेख सलमान यशवंत जाधव, चालक जितेंद्र चौधरी व निखिल मडसे यांनी कारवाई केली.