36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home यशोगाथा जिल्हाधिकाऱ्यांनी केली रहीत येथील फळबागेची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली रहीत येथील फळबागेची पाहणी

0
55

blank

  • प्रगतशील सचिन ठाकरे यांच्या सफरचंद, सीताफळ बागेला भेट

वाशिम, दि. ०3 : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी  २ जुलै रोजी मंगरूळपीर तालुक्यातील रहीत येथील फळबागांची पाहणी केली. येथील प्रगतशील शेतकरी सचिन मधुकर ठाकरे यांच्या शेतामधील विविध प्रकारच्या फळबागांची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषि अधिकारी रवींद्र इंगोले यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी मधुकर ठाकरे, सचिन ठाकरे, प्रवीण ठाकरे उपस्थित होते.

ठाकरे कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या ३२ एकर क्षेत्रावर रोजगार हमी योजना व पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेतून फळबाग लागवड केली आहे. यामध्ये संत्रा, पेरू, आंबा, संत्रा किन्नो, विविध प्रजातीची सिताफळे व सफरचंद आदी फळबागांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी श्री. ठाकरे यांच्या शेतामध्ये जावून सर्व प्रकारच्या फळबागांची पाहणी केली. तसेच प्रत्येक फळपिकासाठी येणारा उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न याविषयी माहिती जाणून घेतली. श्री. ठाकरे यांच्या शेतातील ठिबक ऑटोमायझेशन, शेततळे, नर्सरीची सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले की, फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन करून त्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. याकरिता सर्व कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजना व इतर अनुषंगिक बाबींची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

blank