
गोंदिया,दि.04ः-तालुक्यातील पांजरा, खमारी, आसोली व कामठा, जि. प. क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस भवन येथे चार जिल्हा परिषद क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तांची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार जैन म्हणाले की, जिल्ह्याला प्रफुल पटेल जी सारखे खंबीर नेतृत्व मिळाले असून कोवीड संक्रमणाच्या काळात जे कार्य पटेल यांनी केले ते इतर कुणीही करु शकत नाही. गोंदियाला आँक्सीजन व इतर आरोग्य सुविधा ची कमतरता भासु दिली नाही. पटेल यांचे नेतृत्व शेतकरी, कामगार, मजुर यांच्या हिताचे असुन त्यांनी नेहमी सामान्य माणसाचाच सतत विचार केला आहे. कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे तरच मतदाता पर्यंत पक्षाचे जनहिताचे कार्य पोहचतील.यावेळी जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांनी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रमुखांना सुचना करीत पार्टी संगठन मजबुतीने कार्य करण्यासोबतच प्रत्येक बुथ पातळीवर कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे व जि.प. व प. स. निवडणूक बाबतीत पक्ष संघटन मजबूतीबाबद चर्चा व मार्गदर्शन केले. यावेळी मा. राजेन्द्र जैन, यांच्या सोबत सर्वश्री विजय शिवनकर, सौ. राजलक्ष्मीताई तुरकर, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले , जगदीश बहेकार, केतन तुरकर, गणेश बर्डे, डॉ. मोहित गौतम, सौ. उषा मेश्राम, किरण बारापात्रे , सौ. सपना अग्रवाल, प्रतीक हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, सुनील पटले, शैलेश वासनिक, गंगाराम कापसे, सुरेश चुटे, मनोज दहीकार, रामू चुटे, सौ. रेखा जमदाळे, सौ. सीमा मेंढे, विजय ठाकूर , पृथ्वीराज रहांगडाले, नृपाराज जांभुळकर ,विजय कुमार रहांगडाले, डॉ. तुळशीराम शिवणकर, दुळीराम भाकरे, टिलक पटले, सुरेश कावडे, नागो बन्सोड, जयेंद्र कुंभारे, धर्मेंद्र गणवीर, पवन धावडे, कान्हा बघेल, आरजू मेश्राम, सहेसराम उपवंशी, पुरणलाल उके, आशिष ठाकूर, राजेंद्र नागपुरे, कमलशिंह बघेल, रमेश बावनथडे, दीपक राऊत, कैलास मेश्राम, संजय भेंडारकर, ईश्वरदास पाथोडे, दीपक नारनवरे, हिवराज पटले, बन्सीधर अग्रवाल, अरविंद गणवीर, खेमेंद्र कटरे, बबलू कटरे, सत्यवान बनकर, बळीराम निखाडे, उमेश मानकर, राजेश वाकले, चिंधू गायधने, सुनील मानकर, प्रेमलाल मानकर, कोमल नांदगावली, रेखराम लांजेवार, डी. एच. बोरकर, मोनू मेश्राम, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थितीत होते.
*गोंदिया तालुक्यातील असंख्य कार्यकर्तांचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश*
राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे तालुक्यातील असंख्य कार्यकर्तानी प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी उपस्थित माजी आमदार राजेंद्र जैन जी व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांनी कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ व पक्षाचा दुप्पटा वापरुन पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेशित सर्वश्री रुपेश मानकर, नामदेव मेश्राम, अमुल लाडे, शुभम तवाडे, ज्ञानेश्वर लाडे, रजत भोयर, संगिता काटेवार, लक्की रंगारी, हरिचंद नागपुरे, कन्हैयालाल उके, विद्याकुमार बहेकार, हरिचंद उईके, राकेश परिहार, रोहित नागपुरे, राजेंद्र नागपुरे, त्रिवेश्वर कुंभलवार, कमल उपराडे, अमरसिंग मच्छीरके, जयेंद्र अम्बादे, देवदत्त बोरकर, दिपक राऊत, योगेश येडे व अन्य असंख्य कार्यकर्तांनी पक्ष प्रवेश केला.





