
– आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात मांडली व्यथा
पुणे-पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या MPSCची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतू तरीही नोकरी न मिळाल्याने स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्येचे पाउल उचलले. त्याचे अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहलं. स्वप्नीलने गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली.
स्वप्नीलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. मात्र तरीही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली. त्यात तो म्हणाला, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका” असे त्याने म्हटले आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वप्निल सुनील लोणकर रा. फुरसुंगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निलच्या वडिलांची शनिवार पेठेत प्रिंटींग प्रेस आहे. स्वप्निलचे आईवडिल तिथे काम पाहत असत. बुधवारी नेहमीप्रमाणे दोघे जण प्रेसमध्ये गेले होते. तर स्वप्निलची बहिण बाहेर गेली होती. दुपारच्या सुमारास घरी आल्यानंतर, स्वप्निल कुठेच दिसत नसल्याचे पाहून त्याच्या बहिणीने त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. स्वप्निलने तेथे गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती तत्काळ आई वडिलांना दिली. त्यानंतर जवळील रूग्णालयात स्वप्निला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले. अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर स्वप्निलने स्पर्धा परीक्षांमध्ये मोठं यश मिळवलं होतं. तो २०१९ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला. मात्र कोरोनाकाळातील निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही पू्र्व परीक्षा दिली. त्यामध्येही तो उत्तीर्ण झाला. विविध जिल्ह्यातील निर्बंधामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.





