
भंडारा–केंद्र सरकारचे गॅस, खाद्यतेल व पेट्रोल-डिझेलच्या केलेल्या दरवाढीचा जाहिर निषेध आणि दरवाढ मागे घेण्याबाबत भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फ भंडारा येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांना जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.
कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. सामान्य जनता, शेतकरी व मोलमजुरी करणार्या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यामुळे त्यांना जिवन जगणे कठिण झाले आहे. शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत बुडालेला आहे. त्यातच महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य जनतेला वाढत्या महागाईमुळे आपले उदरनिर्वाह करणे कठिण झालेले आहे. तरीही केंद्र सरकार मात्र मृग गिळून बसले आहे. त्यामुळे गॅस, खाद्यतेल व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे निषेधार्थ व दरवाढ कमी करण्याबाबत आंदोलन करून मागण्यांचे निवेदन भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाअध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणिस धनंजय दलाल, अँड. जयंत वैरागडे, अँड.विनयमोहन पशीने, बाबुराव बागडे, महेंद्र गडकरी, सरीता मदनकर, यशवंत सोनकुसरे, सुमेध श्यामकुवर, नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, बाळा गभने, आशिष दलाल, विष्णु कढीखाये, प्रा.बबन मेर्शाम, उमेश ठाकरे, आरजु मेर्शाम उपस्थित होते.





