
सालेकसा,दि.05ः- नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात नक्षल चळवळीला रोखण्याच्या उद्देशाने तसेच आदिवासी बांधवामध्ये शासन व पोलिस प्रशासनाप्रती विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण व्हावी. तसेच शासकीय यंत्रणा ही अतिदुर्गम भागात वास्तव्यास असणार्या जनतेकरिता सतत सहकार्य करीत असल्याची भावनानिर्माण व्हावी या दृष्टीने २ जुलै रोजी पोलिस स्टेशन सालेकसा अंतर्गत पोलिस बेस कॅम्प मुरकुटडोह येथे अधीक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत गरजू शाळकरी विद्याथिंर्नींना सायकलचे वितरण करण्यात आले.घरापासून ते शिक्षण घेत असलेले शाळेचे अंतर खूप लांब असल्याने त्यांच्या अडचणीची जाणीव लक्षात घेत मुलींच्या भावी शिक्षण लक्षेत घेवून मुरकुटडोह भागातील एकूण ७ विद्याथिंर्नींना पोलिस अधीक्षक पानसरे यांच्याहस्ते सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकुल, सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले, बेस कॅम्प मुरकुटडोहचे प्रभारी अधिकारी सपोनि. दिनेश बागुल, पोउपनि उल्लेवार, पोउपनि. संजय नाग (छ.ग.) पोउपनि. मोहित करोलिया, भगतसिंग, मुव्हेल धनसिंग, तसेच इतर अधिकारी व पोलिस अंमलदार व गावातील प्रतिष्ठीत नागपूर उपस्थित होते. दरम्यान नक्षलग्रस्त भागातील नागरिकांनी नक्षल्यांच्या भुलथापांना बळी न पडता, शासकीय योजनांचा लाभ घेवून आपले जीवन सुकर करावे व शासनाच्या मुख्य पवाहात सामील व्हावे असे मत व्यक्त केले. तसेच विद्याथिंर्नींना पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांतर्गत कोरोना संसगार्चा लक्षात घेवून सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.





