
सडक अर्जुनी/अर्जुनी मोर.दि.05 :--दिवसेगानिक वाढतअसलेल्या महागाई विरोधात जनता होरपळून निघत आहे.पेट्रोल, डिझेल,गॅस ची सतत होणारी दरवाढ, खाद्य तेलाच्या वाढत्या किमती, खत-कीटकनाशके च्या किमतीत झालेली वाढ, शेतकरी विरोधी कायदे,देशामधे नोकर भर्ती करुन बेरोजगारांना रोजगार मिळवुन देने व ईतर केंद्र सरकारच्या अन्यायकारक निती विरोधात तहसील कार्यालय अर्जुनी मोर. व सडक अर्जुनी येथे आज ( ता.पाच ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावे असलेले निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार देशात पेट्रोल, डिझेल, स्वंयपाकाचा गॅस,रासायनिक खते, खाद्य तेल इत्यादी च्या किंमती दररोज वाढत असुन पेट्रोल, डिझेल ने शतक पार केलेला आहे. गॅस सिलिंडर चे दर 930 रुपये झाले आहे. दैनंदिन आहारातील खाद्य तेल 200 रुपयांवर पोहचला आहे. गॅस च्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबाला गॅस विकत घेणे परवडत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. देशामध्ये महागाईचा भडका उडाल्याने शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार व सर्वसामान्य जनतेची किंमत वाढीमुळे जनतेची दयनीय स्थिती झाली आहे. अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालय ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे , किशोर तरोणे, नामदेव डोंगरवार ,बंडू भेडारकर, यशवंत गणवीर ,सोणदास गणवीर, भोजराम राहिले, राकेश लांजे, योगेश नाकाडे, दिंनदयाल डोंगरवार ,यशवंत परशुरामकर, दीपक सोनवणे ,उद्धव मेहंदळे, श्रावण मेंढे ,आर.के .जांभुळकर, रतिराम राणे,सुशीला हलमारे, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा, मनीषा तरोने , निसार पठाण,निशा मस्के ,अनिशा पठाण ,ऋचा भोवते,सुनीता जयस्वाल, पिंटू जीवानी, डॉक्टर दीपक रहेले ,राकेश जयस्वाल, सुधीर साधवानी, त्र्यंबक झोळे, निपल बरैया ,श्रीदान पालीवाल, अजय पाऊलझगडे, नितीन धोटे, भागवत नाकाडे ,मनीषा नाकाडे, सरिता नंदेश्वर,तुकाराम मळावी मनोहर शहारे ,शालिक हातझाडे, रवी बडोले ,सुखदेव मेंढे, रवी बनपूरकर ,मोरेश्वर रहीले व शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे यांनी तर संचालन उध्दव मेंहदळे, तर उपस्थितांचे आभार योगेश नाकाडे यांनी मानले.
सडक अर्जुनी –पेट्रोल , डीझेल व ऐल.पी.जी याच्या वाढलेल्या किमती विरोधात रास्टवादी कांग्रेस सडक अर्जुनी तर्फे केंद्र सरकारने जिवनाशक्य वस्तूचे भाव वाढविले. त्या विरोधात निदर्शने करुन तहसीलदार यांना पंतप्रधान यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.त्यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश काशिवार,माजी जि.प.सदस्य रमेश चुर्हे,मिलन राऊत ,नरेश भेडारकर,ऐफ आर टि शहा महासचिव किसान सभा,दिनेश कोरे ,उमराव मांढरे,पुष्पमाला बडोले,मंजुताई डोंगरवार ,वंदना डोंगरवार,शिवाजी गहाने,देवाजी बनकर,वंदना थोटे,शुभांगी वाढवे ,वंदना डोये,डी.यू.रहागडाले,दिलीप गभने,अमिन शेख,आशिष येरने,शशीकला टेभूर्ने, अफ्रोज शेख व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





