राष्ट्रीय समाज पक्ष खानापुर युवक तालुका अध्यक्षपदी यशवंत दिलीप माने

0
43

खानापुर,दि.05ः राष्ट्रीय समाज पक्षाच्या खानापुर युवक तालुका अध्यक्षपदी यशवंत माने यांची निवड करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण भाऊ सरगर,सांगली जिल्हा युवक अध्यक्ष उमाजी (दादा) चव्हाण, आटपाडी तालुका अध्यक्ष सत्यजित गलंडे, विशाल सरगर,विकास सरगर,समाधान घुटुगडे,पवन रास्ते,आकाश मासाळ,वैभव घुटुगडे,सचिन माने,सतिश मदने,राहुल माने,सुभाष माने,समाधान माने,बाळु माने,सचिन माने,अनिकेत माने,शुभम माने,विकास माने,संतोष माने,राष्ट्रीय समाज पक्ष सांगली जिल्हा सरचिटणीस अजित (शेठ) कटरे तसेच सर्व रासप कार्यकर्ते, राष्ट्रीय समाज पक्ष खानापुर तालुका मित्र परिवार व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निवडीचे पत्र देण्यात आले.सदर नियुक्ती चा कार्यकाल पक्षाचे ध्येय व धोरणाद्वारे पक्षातील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबून असेल.या पदावर पक्षात कार्यरत असताना पक्षाचे सर्व नियम व अटीशी बांधील आहात, आपल्या निवडीने पक्ष तसेच माननीय महादेव रावजी जानकर राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री यांचे विचारसरणी मार्ग समाजातील सामान्य पासून उच्च स्थानापर्यंत पोचेल पक्षाचे कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्ते बंधू-भगिनींना मध्ये पक्षाचा आदर व शिस्त अबाधित ठेवाल ही अपेक्षा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाला यशस्वी करून आपण आपली निवड सार्थ ठरवली असा विश्वास आहे. भावी काळातील आपला कार्यकाल पक्षाचा फलदायी ठरू राष्ट्रीय समाज पक्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा असेही त्यांनी म्हटले आहे. नूतन खानापूर युवक तालुका अध्यक्ष यशवंत माने यांनीही संधीचे सोने करु असे बोलताना सांगितले.