43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता लोहारा मारहाण प्रकरणातील संशयीताची हत्या

लोहारा मारहाण प्रकरणातील संशयीताची हत्या

0
91

blank

कुटुंबियांचा पोलिसांवर आक्रोश
गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत लोहारा येथील एका चोरी प्रकरणातील संशयीत आरोपी राजेश्वर किरसान (३०) रा. लोहारा याला गावातील १० ते १२ नागरिकांनी २३ जून रोजी जब्बर मारहाण केली होती. यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ठाण्यात घेवून गेले. मात्र तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. अशातच ( ता. ६) त्याचा मृतदेह सौंदड जंगल शिवारात आढळला. त्याची हत्त्याच झाली असून या प्रकरणाला पोलिसच जबाबदार असल्याचा आरोपी मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे या घटनेने पोलिस प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर असे की, दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत एका चोरी प्रकरणात संशय असल्याच्या आरोपावरून गावातील १० ते १२ नागरिकांनी राजेश्वर किरसान याला गावातील बिरसामुंडा चौकात बेदम मारहाण केली होती. यानतंर घटनेची माहिती पोलिसांना मिळतचा पोलिसांनी राजेश्वरला पोलिस ठाण्यात घेवून गेले. मात्र तेव्हा पासून तो घरी परतला नव्हता. या प्रकरणाला घेवून मृतक राजेश्वरची पत्नी सेवांगन किरसान यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा, पोलिस अधीक्षक तसेच गृहमंत्र्यांना तक्रार अर्ज लिहून न्यायाची मागणी केली होती. दरम्यान तक्रार अर्जावरून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतला होता. राजेश्वर बेपत्ता असल्याने पोलिसांवरही प्रचंड तणाव होता. दरम्यान मारहाण प्रकरणातील एका संशयीताची कसून चौकसी केली असता, त्यात या हत्येचे बिंग फुटले. दरम्यान (ता.६) पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या उपस्थितीत सौंदड परिसर जंगल शिवारातून जमिनीत पुरलेला राजेश्वरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधिन करण्यात आले. यावेळी मृतकाची पत्नी सेवांगन किरसान यांनी या प्रकरणाला दवनीवाडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जबाबदार असल्याचा आरोप करीत न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये पूर्वीच गुन्हा नोंद केला आहे. त्यातच आता हत्येचा गुन्हा नोंद केला असून मारहाण प्रकरणातील १२ आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.
—–
पोलिसांनी राजेश्वरला सोडले कसे ?
मृतक राजेश्वर यांच्या पत्नीने माझ्या पतीची मारहाण करून हत्या करण्यात आली. या बाबतची तक्रार घटनेनंतर करण्यास दवनीवाडा पोलिस ठाण्यात गेली असता, पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही.त्यानंतर राजेश्वरच्या पत्नी व आईने न्यायासाठी पोलिस अधीक्षक, आदिवासी संघटन तसेच गृहमंत्री, मुख्यमंत्री व पोलिस महानिरिक्षक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना तक्रार दिली. त्यानंतर उपविभागीय अधिाकर्‍यांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनेच्या दिवशीच राजेश्वरला उपचार दिले असते तर तो कदाचित वाचू शकला असता. परंतु पोलिसांनी राजेश्वरला सोडले कसे, हा चौकशीचा विषय असून त्यांच्या हत्येला पोलिस प्रशासनच कारणीभूत असल्याचा टाहो सेवांगन किरसान यांनी फोडला.

blank