
दारव्हा दि.7;-दारव्हा येथील पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या मारहाणीत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरातील संतप्त जमावाने पोलिस स्टेशनवर गोटमार केल्याची घटना मंगळवार दिनांक सहा जुलैला रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली या घटनेमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान दारव्हा शहर पोलिसांनी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील युवकांना पकडून आणले त्यांना नेमकी कुठल्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडले याबाबत मात्र नेमकी माहिती मिळू शकली नाही सदर युवकांना पोलिसांनी पकडून आणल्यानंतर तीनही युवकांना जबर मारहाण केल्याने यातील एका युवकाचा शेख इरफान शेख शब्बीर वय (वर्ष 27) दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटनास्थळावर बोलल्या जात होते. पोलिसांच्या मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने येथील पोलिस स्टेशनवर दगडफेक केली असून शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.