34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News कमलापूर-दामरंचा रस्त्यावरुन स्फोटके जप्त

कमलापूर-दामरंचा रस्त्यावरुन स्फोटके जप्त

0
19

blank

गडचिरोली, दि..३०: घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी पेरुन ठेवलेली स्फोटके शिताफीने ताब्यात घेऊन पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावला. ही स्फोटके अहेरी तालुक्यातील कमलापूर-दामरंचा मार्गावर आढळून आली.
कमलापूर-दामरंचा मार्गावरील आशा तलावाजवळील गणेश मंदिरासमोरील रस्त्याच्या अगदी मध्यभागी स्फोटके पेरुन ठेवण्यात आली होती. नक्षलविरोधी अभियान राबविताना पोलिसांचा घातपात करण्याची नक्षल्यांची योजना होती. परंतु काल( दि..२९) स्फोटके जमिनीत पुरुन ठेवल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या साहयाने स्फोटके बाहेर काढली. नक्षल्यांनी जमिनीत खड्डा करुन त्यात एक स्टील डबा ठेवला होता. या डब्यात २० किलो स्फोटके, दोन फूट कोर्डेक्स वायर व डिटोनेटर आढळून आले. पोलिसांनी अज्ञात नक्षलवाद्यांविरुद्ध रेपनपल्ली उपपोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

blank