
वाशिम, दि. ०७ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या तुळजापूर (ता. मंगरूळपीर) येथील अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात वर्ग ६ ते १० वी (सेमी इंग्रजी माध्यम) पर्यंतच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज ३१ जुलै २०२१ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एल. झेड. सुरजुसे यांनी केले आहे.
निवासी शाळेत मोफत भोजन, निवास व ग्रंथालयीन, डिजिटल वर्ग खोल्या, सुसज्ज संगणक कक्ष तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. या शाळेतील प्रवेशित जागांसाठी अनुसूचित जातींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमातींसाठी १० टक्के, व्ही. जे.एन.टी. करिता ५ टक्के, वि.मा.प्र. करिता ३ टक्के, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी २ टक्के प्रमाणे आरक्षण राहील. विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज निवासी शाळेमध्ये मोफत उपलब्ध असून प्रवेश अर्ज ३१ जुलै २०२१ पर्यंत भरावेत, असे श्री. सुरजुसे यांनी कळविले आहे.