43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home शैक्षणिक आॅनलाईन प्रश्नमंजुषेद्वारा स्पर्धा परीक्षेचे बिजारोपण;महेंद्र रहांगडाले व सुरेंद्र गौतम यांचा स्तुत्य उपक्रम

आॅनलाईन प्रश्नमंजुषेद्वारा स्पर्धा परीक्षेचे बिजारोपण;महेंद्र रहांगडाले व सुरेंद्र गौतम यांचा स्तुत्य उपक्रम

0
40

blank

गोंदिया : दि.१6- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडॉऊनमुळे इयत्ता पाचवी पासून सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद पडल्या व सर्वांसोबतच शाळेत शिकणारे विद्यार्थी सुद्धा घरातच बंदिस्त झाले. म्हणतात ना ‘रिकामे मन भुताचे माहेरघर’ अशी अवस्था सर्वांचीच झाली. विद्यार्थ्यांवर या घरबंदीचे अनिष्ट परिणाम होत आहेत. हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसातील काही वेळ तरी व्यस्त ठेवावे, मोबाईल तंत्रज्ञानाचा सदुपयोग व्हावा व त्यासोबतच त्यांना ज्ञान मिळावे, स्पर्धा परीक्षेची आवड लागावी. शिक्षक,पालक यांचे सामान्यज्ञान अद्ययावत व्हावे या हेतूने गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकरी (पं. स. देवरी) येथील उपक्रमशिल शिक्षक महेंद्र राहांगडाले यांनी १७ एप्रिल २०२१ पासून आॅनलाइन प्रश्नमंजुषा सुरू केली. यासाठी त्यांनी www.mahendrarahangdale.blogspot.com या ब्लाॅगची निर्मिती केली. प्रथम २५ भाग हे गोंदिया जिल्ह्यावरील प्रश्नांवर होते. यातुन गोंदिया जिल्ह्यातील ज्या माहितीपासून विद्यार्थ्यांसह अनेकजण अनभिज्ञ होते अशी माहिती शासनाच्या विविध वेबसाईट व कागदपत्रे यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांकरीता या माध्यमातून उपलब्ध झाली. या ऑनलाइन प्रश्नमंजुषेला विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य जि. प. ढोडरा येथील शिक्षक व शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम उपक्रमाच्या सुरवातीपासूनच करत आहेत. गोंदिया जिल्ह्याविषयी २५० प्रश्नांची मालिका संपल्यानंतर ‘महाराष्ट्राचा भूगोल’ या घटकावर ५० प्रश्नमंजुषा व सध्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंजुषा या उपक्रमांतर्गत सुरू आहे.blank
        या प्रश्नमंजुषेचे ९० भाग पूर्ण झाले असून सतत सुरू आहे. गोंदिया जिल्हा प्रश्नमंजुषा या मालिकेला विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांचे १०००० पेक्षा जास्त प्रतिसाद मिळाले व स्वतःचे ज्ञानवर्धन केले. प्रत्येक प्रश्नमंजुषेला दररोज दोनशे ते तीनशे विद्यार्थी, पालक, शिक्षक सोडवत आहेत.
       या ऑनलाइन प्रश्नमंजुषेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोमेटेड प्रमाणपत्र दिले जाते. तसेच दैनिक संदेशातून कोरोनाविषयी, लसीकरणाविषयी जनजागृतीही केली जाते. या प्रश्नमंजुषेचे सर्व भाग www.mahendrarahangdale.blogspot.com या ब्लॉग वर सोडवण्यासाठी नेहमीकरिता उपलब्ध आहेत. आजपर्यंत या प्रश्नमंजुषेला सुमारे वीस हजार पेक्षा अधिक प्रतिसाद मिळालेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील हा अशा ऑनलाइन स्वरूपाचा व निरंतर चालणारा व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लावणारा पहिलाच उपक्रम आहे. सध्या या उपक्रमाकरिता प्रश्न संकलन व संपादनाचे कार्याला संतोष पारधी सर, तुषार सिंगनजुडे सर यांची मदत मिळत आहे.
2 Attachments

blank