
तुमसर,दि.17ः- तालुक्यातील डोंगरी बु.येथे समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमात खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थीतीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी प्रफुल पटेल संबोधित करतांना म्हणाले कि, या क्षेत्राच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असून अनेक विकासाची कामे केली आहेत व करत राहणार,आपण विकास करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मागील काही दिवसापासून विकासाची मोठं – मोठी कामे थांबलेली आहे, ज्या लोक प्रतिनिधींना निवडून दिले ते विकासाकडे लक्ष देत नाही. बावनथडी सारख्या अनेक प्रकल्पांची प्रलंबित कामे आम्हच्या प्रयत्नांनी पूर्ण केली असून आता महविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून उर्वरित कामे पूर्ण करू. आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे, बावनथडी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. सतत दोन वर्ष शेतकऱ्यांना बोनस देण्यात आला. ज्या लोकांनी शेतकर्यांच्या मालाला दुप्पट भाव देऊ असे आश्वासन दिले होते त्यांनी आता पेट्रोल, डीजेल व महाग केल्याने शेतकर्यांच्या मशागतीचा खर्च दुपटीने वाढून शेतकरी महागाईने मेळकुटीस आला आहे. रब्बी हंगामातील धानाच्या खरेदीला मुदतवाढ मिळवून दिली. पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जि. प.पर्यवेक्षक व बुथ प्रमुखांनी प्रत्येक गावात बैठका लावुन नियोजन करण्याचे काम करावे व प्रत्येक घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहचविण्याचा प्रयत्न करावा. पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा प्रसार प्रचार करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, प्रत्येक बुथ वर किती लोक आहेत याचा विचार करून प्रत्येकाला पक्षाशी जोडण्याचे काम करावे. यावेळी बैठकीला प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेन्द्र जैन, राजू कारेमोरे, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, विठ्ठल कहालकर,सरिता मदनकर, पमाताई ठाकूर, सरोजताई भुरे, मंजुषाताई बुरडे, कुशलता गजभिये, जयश्री गभने, मधुमती साखरवाडे, कविता साखरवाडे, विद्याताई कोकोडे, उमाताई साखरवाडे, शुभांगी रहांगडाले, साधना चौधरी,राजेश भट, चेतन मिरचूळे, तुळशीदास गौपाले, अनिल टेकाम, रामचंद करमकर, बिसराम धुर्वे, रोशन सावनवान,सुरेश रहांगडाले, घनश्याम नानोरे,महेश नंदेश्वर, कमलेश गुर्वेकर, युवराज वाघमारे, दिलेन्द्र चौधरी, कुलपत कटरे, सुरेश वहिले, सुरेश बर्वे, सुनीता वरकडे, शेखर टेकाम,हिम्मत उईके , चंपालाल भट,रामकिसन मसराम,सहित अन्य पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात खासदार प्रफुल पटेल जी च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मध्ये श्रीमती वंदना आकरे यांनी पक्ष प्रवेश केला. खासदार श्री पटेल यांनी पुष्पगुच्छ व पक्षाचा दुप्पटा वापरून स्वागत केले.





