40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ आंतरराज्य बियाणांची गोंदियात लागवड;रेखलाल टेंभरे यांच्या प्रयत्नांना यश

आंतरराज्य बियाणांची गोंदियात लागवड;रेखलाल टेंभरे यांच्या प्रयत्नांना यश

0
56

गोरेगाव–डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र हिवरा व गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड गोरेगाव व बोरकन्हार फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने परराज्यातून धान्याचे सुधारित बियाणे गोंदिया जिल्ह्यात आणायचे कार्य टेंभरे यांनी केले आहे.
या बियानांनची लागवड गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड गोरेगाव व बोरकन्हार फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड गोरेगाव च्या संयुक्त विद्यमानाने केले जानार आहे. यामध्ये कृषी विद्यापीठ तेलंगणा व नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट कटक ओडिशा-753006 कडून CR, संता, समृद्धी, CR-102, CR-110, CR-209 CR-308 आदि अनेक प्रकारचे धानाचे ब्रीडर/फाउंडेशन व संशोधित बियाणे आयात केली आहे.
बियाणांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात येणार आहे व हल्लीच्या काळात शेतीत लागवड करण्यात येणाऱ्या धानाच्या जाती मध्ये सुधारणा करून चांगल्या प्रतीचे बियाणे निर्मिती करण्याचे कार्य गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड गोरेगाव, बोरकन्हार फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गोरेगाव हि कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र हिवरा, व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या साह्याने भात शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी व कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आणि फायद्याची शेती होण्यासाठी प्रकल्प राबवीत आहेत. सदर प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपली शेती कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी व जास्त फायद्याची करावी असे आव्हान रेखलाल टेंभरे (अध्यक्ष गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड गोरेगाव) यांनी केले आहे.