
यवतमाळ-वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षकार्याला अधिक गतिमान, प्रभावी व व्यापक करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंंधती सिरसाट सोमवार, 19 जुलै रोजी यवतमाळाला येत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी केलेले कार्य, जिल्ह्यातल्या ग्रामीण व शहरी जनतेला भेडसावत असणार्या समस्या, अन्याय अत्याचाराचे प्रश्न आणि आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेला दिलेला दिलासा या संदर्भात आढावा बैठक सोमवारी विश्रामभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, कार्याध्यक्ष रणधीर खोब्रागडे, उपाध्यक्ष मंगल तेलंग व शैलेश भानवे, महासचिव अॅड. श्याम खंडारे यांनी केले आहे.




