34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ वाशिम जिल्ह्यात ४,गडचिरोली 5,गोंदिया 2,बुलडाणा 7,भंडारा 0 कोरोना बाधित

वाशिम जिल्ह्यात ४,गडचिरोली 5,गोंदिया 2,बुलडाणा 7,भंडारा 0 कोरोना बाधित

0
49

blank

गोंदिया,दि.19 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 19 जुलै रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत 41,174 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,461 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली
आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 12 आहे. 8 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 575 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.04 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 518.3 दिवस आहे. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 211247 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 186152 नमुने निगेटिव्ह आले तर 21481 नमुने पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 220857 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 199772 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 21085 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.

वाशिम जिल्ह्यात आणखी ४ कोरोना बाधित; ११ जणांना डिस्चार्ज

वाशिम : शेलू- १.रिसोड : कवठा- १.मंगरूळपीर : अजगाव- १.कारंजा : शिक्षक कॉलनी- १.कोरोना बाधितांची सद्यस्थिती –एकूण पॉझिटिव्ह – ४१६१६,ऍक्टिव्ह – ६८,डिस्चार्ज – ४०९२५,मृत्यू – ६२२

गडचिरोली जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त, तर 5 नवीन कोरोना बाधित

 गडचिरोली,दि.19: आज जिल्हयात 05 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 05 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30514 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29671 वर पोहचली. तसेच सद्या 100 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 743 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.33 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.नवीन 05 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 00, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 05 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 01, अहेरी 01,  आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 02, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 00, सिरोंचा 01, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 7,एकूण पॉझिटिव्ह : 87209,मृत्यू : 667,आतापर्यंत डिस्चार्ज :86523,आजचे डिस्चार्ज : 3

जिल्ह्यात आज एका रुग्णाला डिस्चार्ज;कोरोना पॉझिटिव्ह निरंक

भंडारा, दि.19: जिल्ह्यात आज 304 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आली नाही तसेच आज डिस्चार्ज रुग्णांची संख्या केवळ एक आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58665 झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59798 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे.आज 304 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली नाही. आतापर्यंत 04 लाख 30 हजार 120 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59798 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58665 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59798 झाली असून 03 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1130 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

blank