
चिचगड,दि.20ः-. चिचगड पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंडे गावाजवळ ट्रक आणि मोटर सायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना आज मंगळवारला घडली.मृत मोटर सायकलस्वाराचे नाव दिलीप लेंडे वय 30 राहणार सिंगनडोह असे आहे.एक साथीदार जखमी झाला आहे. मृत हे सात्या घेऊन नवेगावाकडे जात असताना हा अपघात झाला.




