33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील रस्ते बांधकामाकरिता 32.54 कोटींचा निधी मंजूर

तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील रस्ते बांधकामाकरिता 32.54 कोटींचा निधी मंजूर

0
52

blank

गोरेगाव, दि.20 : कोणत्याही गाव किंवा शहराचा विकास हा तेथील उत्तम व दर्जेदार रस्त्यांवरून दिसून येतो. रहदारीसाठी उत्तम रस्ते असणे ही विकास प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. त्यामुळे रस्ते विकासातून गाव विकास ही बाब लक्षात घेवून आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील रस्ते बांधकामासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 32.54 कोटींचा निधी खेचून आणला.

विशेष म्हणजे सिंचन विकासाबरोबर विधानसभा क्षेत्रातील रोड-रस्ते विकासाकरिता शासनाकडून निधी खेचून आणण्याबाबत तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांची महत्वापूर्ण भूमिका आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सन 2000 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील 1000 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांद्वारे जोडणे हा आहे. सध्या सदर योजनेअंतर्गत बिगर आदिवीसी भागात 5000 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील 250 पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांव्दारे जोडण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग-1 व 2 मधील सुरू असलेल्या कामांसाठी नोव्हेंबर 2015 पासून हिस्सा पध्दतीत 60:40 असा बदल केलेला आहे.

याच धर्तीवर दवनीवाडा-झाडूटोला-खातीटोला-गंगाझरी एकूण 6 किमी लांब रस्त्याकरिता 476.58 लाख, भडंगा (रा.मा.753) पिंडकेपार-पाथरी-भूताईटोला-सिलेगाव-चीचगावटोला-सटवा-डव्वा एकूण 13.700 किमी लांब रस्त्याकरिता 978.02 लाख, तुमखेडा बु.-मिलटोली-गणखैरा (इजीमा-59) एकूण 5 किमी लांब रस्त्याकरिता 420.18 लाख, सिंधीटोला-जमुनिया बसस्टापटोला ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 पर्यंत एकूण 4.33 किमी लांब रस्त्याकरिता 199.60 लाख, लाखेगाव-बेरडीपार खुर्द-आलेझरी एकूण 8.91 किमी लांब रस्त्याकरिता 746.96 लाख, अर्जुनी-गोदरीटोला-सावरा-पिपरिया-कन्हारटोली-चांदोरीखुर्द-बिहीरिया एकूण 4.41 किमी लांब रस्त्याकरिता 332.51 लाख असे एकूण तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रात 35 किमी रस्त्यांकरिता 32 कोटी 53 लाख 85 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर माहिती आमदार विजय रहांगडाले यांनी दिली आहे.

blank