33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home शैक्षणिक तृतीय वर्ष बीएस्सी काम्प्युटर सायन्स सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर

तृतीय वर्ष बीएस्सी काम्प्युटर सायन्स सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर

0
31

blank

* ८४.२३ % विद्यार्थी उत्तीर्ण     * ३ हजार ०२४ विद्यार्थी उत्तीर्ण

 मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेचा तृतीय वर्ष बीएस्सी काम्प्युटर सायन्स सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ८४.२३ टक्के  लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

या परीक्षेत एकूण ३ हजार ०२४ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ३ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ७५८ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४३  विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.  २०२१ च्या उन्हाळी सत्राचे कालपर्यंत विद्यापीठाने ८१ निकाल जाहीर केले आहेत.

   || काल दिवसभरात एकूण ११ परीक्षांचे निकाल जाहीर ||

विद्यापीठाने काल दिवसभरात एकूण ११ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यात बीएस्सी काम्प्युटर सायन्स सत्र ६  सोबत  बीई ( मेकॅनिकल इंजिनियरिंग ) सत्र ७, बीकॉम ( फायनान्शियल मॅनेजमेंट ) सत्र ५, बीकॉम ( ट्रान्सपोर्ट  मॅनेजमेंट ) सत्र ५, बीई ( सिव्हील इंजिनियरिंग ) सत्र ८, बीई ( काम्प्युटर इंजिनियरिंग ) सत्र ८, बीई ( केमिकल इंजिनियरिंग ) सत्र ७, बीकॉम ( इन्वेस्टमेंट  मॅनेजमेंट ) सत्र ५, बीकॉम ( फायनान्शियल मॅनेजमेंट ) सत्र ६, बीएस्सी सत्र ५ (७५.२५), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज ) सत्र ५ असे ११ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.

RESULT OF TY B.Sc Computer Science  SEM VI (CBCS), Summer Session 2021 Exam held in May 2021

Registered Students : 3767

Appeared Students : 3758

Absent Students : 9

Successful Students : 3024

Unsuccessful Students : 43

Pass Percentages : 84.23 %

blank