37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा टोकियो ऑलिम्पिक: मनू भाकेर, यशस्विनी देसवाल पात्रता फेरीतून बाहेर

टोकियो ऑलिम्पिक: मनू भाकेर, यशस्विनी देसवाल पात्रता फेरीतून बाहेर

0
29

blank

मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल या युवा नेमबाजांना निराशानजक निकालाला सामोरं जावं लागलं. 10 मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत मनूला बाराव्या तर यशस्विनीला तेराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

मीराबाई चानूने पटकावलेल्या पदकाने भारतीय पथकासाठी ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात दणक्यात झाली. रविवारी भारतीय खेळाडूंचे भरगच्च सामने आहेत.

पात्रता फेरीतील अव्वल आठ नेमबाजांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. मनू आणि यशस्विनीला ही संधी मिळणार नाही.

“दुसऱ्या फेरीदरम्यान मनूच्या बंदुकीत तांत्रिक बिघाड झाला. तो बिघाड दुरुस्त करायला वेळ गेला. तिच्याकडे दुसरी बंदूक होती. मात्र त्या बंदुकीशी जुळवून घेण्यात वेळ गेला असता. बिघाड दुरुस्त होईपर्यंत वेळ गेला. मात्र मनूने त्यानंतर चांगली कामगिरी केली. पण शेवटच्या फेरीत तिला 95 गुणांचीच कमाई करता आली. दोन गुणांच्या फरकाने अंतिम फेरीतलं तिचं स्थान हुकलं”, असं प्रशिक्षक रौनक पंडित यांनी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांच्याशी बोलताना सांगितलं.

मनूची पात्रता फेरीत 98, 95, 94, 95, 98, 95 अशी कामगिरी होती. यशस्विनीच्या गुणांमध्ये 94, 98, 94, 97, 96, 95 अशी घट झाल्याने तिचीही अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकली.

मिश्र प्रकारात मनू सौरभ चौधरीच्या साथीने सहभागी होईल. त्यामुळे ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी या दोन्ही युवा नेमबाजांकडे आहे.

मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सहभागी होतील. पुरुषांमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात दीपक कुमार आणि दिव्यांश सिंग पनवर भारताचं प्रतिनिधित्व करतील.

सिंधूची विजयी सलामी

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियात विजयी सलामी दिली. सिंधूने इस्रायलच्या सेनिया पोलिकारापोव्हावर 21-7, 21-10 असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सिंधूची लढत हाँगकाँगच्या चेयुंग न्गान यीशी होणार आहे.

रोइंगपटू उपांत्य फेरीत

अर्जुन आणि अरविंद या जोडीने उपांत्य फेरी गाठली. रोइंग लाइटवेट डबल स्कल प्रकारात उपांत्य फेरी गाठणारी ही पहिली भारतीय जोडी आहे.

या स्पर्धांकडे असेल लक्ष

  • मेरी कोम ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात करतील. शनिवारी पराभवाला सामोरं जावं लागलेल्या बी. साईप्रणीतसाठी आज आणखी एक संधी असणार आहे.
  • जिम्नॅस्ट प्रणिती नायक पात्रता फेरीत सहभागी होईल.
  • शनिवारी जबरदस्त प्रदर्शनासह प्रतिस्पर्ध्यांना चीतपट करणाऱ्या सात्विकसैराज-चिराग शेट्टी जोडीची पुढची मॅच आज असेल.
  • हॉकी संघ आज खेळणार आहे.
  • रोइंग आणि सेलिंगमध्ये भारतीय खेळाडू नशीब आजमावताना दिसतील.
  • टेबल टेनिसपटूंसाठी स्पर्धेत आगेकूच करण्यादृष्टीने रविवार महत्त्वाचा असेल. शरथ कमल, मनिका बात्रा, एस.गुणशेखरन, सुतिर्था मुखर्जी विविध गटांमधून सहभाही होतील.
  • सानिया मिर्झा आणि अंकिता रैना ही जोडगोळी ऑलिम्पिक मोहिमेला सुरुवात करेल.

blank