43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके शोधली पोलिसांनी

नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके शोधली पोलिसांनी

0
59

blank

गडचिरोली,दि.26-28 जुलैपासून सुरू होणाऱ्या नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी  25 जुलै रोजी कुरखेडा तालुक्यातील लवारी गावानजीकच्या जंगलात नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके शोधून ती डिफ्युज केली.

काल सी-60 पथकाचे जवान कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलिस ठाण्यांतर्गत लवारी गावानजीकच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांना नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके व शस्त्रसाठा दिसला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून 1 कूकर बाॅम्ब, पिट्टू, नक्षल शर्ट, एसएलआर, व अन्य बंदुकीची काडतुसे, पुस्तके व अन्य साहित्य ताब्यात घेतले. त्यानंतर कूकर बाॅम्ब शिताफीने नष्ट केला, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

1 मे 2019 रोजी लवारी गावानजीक नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. आता 28 जुलैपासून सुरू होणाऱ्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, नक्षली पुन्हा लवारी परिसरात हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला.

blank