
गोंदिया,दि.27 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 27 जुलै रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच आज डिस्चार्ज
रुग्णांची संख्या शुन्य आहे.गोंदिया व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता इतर तालुके कोरोनामुक्त झालेले आहेत. आजपर्यंत 41,183 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,475 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 7 आहे. 4 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 575 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.28 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 597.4 दिवस आहे. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 215099 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 189989 नमुने निगेटिव्ह आले तर 21483 नमुने पॉझिटिव्ह आले.
गडचिरोली जिल्ह्यात 10 कोरोनामुक्त, तर 7 नवीन कोरोना बाधित
गडचिरोली,दि.27: आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30570 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29766 वर पोहचली. तसेच सद्या 61 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 743 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.20 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.नवीन 7 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 03, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 10 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 02, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 00, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 07, सिरोंचा 01, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.
आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक
भंडारा, दि.27 :- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या निरंक आहे. आज 773 व्यक्तींची चाचणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट 00.13 टक्के आहे. जिल्ह्यात आता 08 सक्रिय रुग्ण आहेत.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58668 झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59806 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 34 हजार 718 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59806 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 01, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58668 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59806 झाली असून 08 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1130 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.





