33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ लाखोळी डाळ व सोयामिल्कचे प्रचारक डॉ. शांतीलाल कोठारी यांचे निधन

लाखोळी डाळ व सोयामिल्कचे प्रचारक डॉ. शांतीलाल कोठारी यांचे निधन

0
60

blank

नागपूर-अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूट्रीशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष व ज्येष्ठ आहार तज्ज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे आज निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
लाख-लाखोळीवरील बंदी हटविण्यात यावी यसाठी सलग चाळीस वर्षे त्यांनी संघर्ष केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात 12 वेळा अन्न सत्याग्रह आंदोलन केले. 2015 मध्ये त्यांनी 86 दिवस सत्याग‘ह आंदोलन केले व खर्‍या गांधीवादी तत्वज्ञानाचा परिचय दिला. त्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला लाखोळीवरील बंदी मागे घ्यावी लागली. देशभरातील बहुतांश राज्यात लाखोळीचे उत्पादन होत असे तसेच ही डाळ देशात एकूण 15 विविध नावांनी ओळखली जायची. पण या डाळीत काही विषारी घटक असल्याने तिच्या सेवनाने लाथॅरिझम नावाचा आजार होत असल्याच्या गैरसमजातून केंद्राने 60 च्या दशकात या डाळीच्या उत्पादनावर बंदी आणली आणि अनेक ठिकाणी पोलिसांनी शेतातील उभी पिके जाळली होती.
त्यानंतर डॉ. शांतीलाल कोठारी यांनी देशभरात जागृती करुन सर्वेक्षणाच्या अभ्यासाअंती या बंदीच्या निर्णयाला आव्हान दिले. डाळीचे सेवन करणार्‍या कुणालाही हा आजार झाला नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. डॉ. कोठारी यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा लाखोळी बंदीच्या विरोधात अन्न सत्याग‘ह केला. 2007 मध्ये हृदय शस्त्रक्रियेनंतर त्यांचे अन्नत्याग आंदोलन 86 दिवस चालले.
आंदोलन काळात ते सोयामिल्क आणि गरम पाणी एवढाच आहार घेत असत. सप्टेंबर 2015 मध्ये सुरू झालेले त्यांचे अन्नत्याग आंदोलन 57 दिवस चालले. त्या नंतर केंद्र सरकारच्या फुड सेफ्टी अ‍ॅन्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने लाखोळी डाळीवरील बंदी उठविण्यात आल्याचे त्यांना कळवले होते. त्या काळात गरीब व सामान्यांना पोषक आहार म्हणून विदर्भात सोयामिल्कचा प्रचार केला व लोकांना सेवनाची सवय लावली. वृत्तपत्रसृष्टीतील अनेक जणांशी त्यांचा स्नेहमयी संवाद होता, पत्रपरिषदेला उपस्थित पत्रकारांना ते आवर्जून लाखोळी डाळीचे भजे खाऊ घालत हे येथे उल्लेखनीय.

blank