
अर्जुनी/मोर :- लोकप्रिय असलेले मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुका शिवसेना अर्जुनी/मोर येथे रुक्षारोपन करुण नावीन्य शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल ,शिवसेना जिल्हा सचिव संजयसिंह पवार,शिवसेना उपजिल्हा महिला उपसंघटिका ममताताई पवार, शिवसेना तालुका प्रमुख चेतन दहिकर ,युवासेना जिल्हा प्रमुख(युवाधिकारी)अश्विनसिंह गौतम ,शिवसेना उपतालुका प्रमुख मोरेस्वर सौन्दरकर,जालंदर दहिवले,शिवभीम सेना सुरेश ठवरे, महिला तालुका संघटिका शिल्पाताई घनाडे,शहर संघटिका प्रतिभाताई वावरे,तालुका युवती युवाधिकारी पूनमताई लाडे, आणि समस्त विभाग प्रमुख शाखा प्रमुख प्रामुख्याने उपस्थीत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात शिवसेनेतर्फे फळ वाटप
कोसमतोंडी:-शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 27 जुलै मंगळवारला सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. सध्या राज्यात काही ठिकाणी पुराची भयावह स्थिती असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचा अवाजवी खर्च न करता किंवा बॅनर पोस्टर न लावता अतिशय साध्या पद्धतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरे करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनोज रामटेके, सचिन फुंडे, महेंद्र वंजारी, अश्लेष माडे, बबन बडोले, सतीश गहाणे तसेच तालुक्यातील इतर शिवसैनिक उपस्थित होते.





