
शासनाची दिशाभूल करून तीन आपत्यवर ही पदावर कायम
गोंदिया,दि.30ः- तालुक्यातील नवरगांव येथील पोलीस पाटील कविता विजेंद्र डहाट यांना तीन आपत्य असून ते गावच्या पोलीस पाटील या पदावर कायम आहेत.त्यामुळे गावातील नागरिकांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यांवे,अशी मागणी केली आहे. पोलीस पाटील कविता विजेंद्र डहाट यांची २०११ मध्ये नेमणूक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नियुक्ती वेळी सादर केलेल्या अपत्य हलफनामामध्ये खोटी माहिती दिल्याचे दिसून आले असून त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे गावातील नागरिकांनी आरोप लावले आहे. पोलीस पाटील कविता विजेंद्र डहाट यांना पहिले आपत्य म्हणून क्षितिजकुमार विजेंद्र डहाट जन्मतारीख १०/०२/२००५ व दुसरे पत्य अथांग विजेंद्र डहाट जन्मतारीख ११/०१/२००८ तसेच तिसरे आप्त्य मैथिली विजेंद्र डहाट जन्मतारीख १५/१२/२०११ असे आहे.पोलीस पाटील कविता विजेंद्र डहाट यांना तीन आपत्य असून त्यांनी दोन अपत्य दाखवून शासनाची दिशाभुल केले आहे.गावातील नागरिकांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याकरीता अनेकदा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकड़े तक्रार केली असता अद्याप पर्यंत त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात आलेले नाही आहे. एका मुलाला त्यांनी दत्तक दिले आहे अशी माहिती सुद्धा मिळाली असून त्यांनी सदर प्रकरणाबाबत शासनाला कळविले नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या जन्ममृत्यु नोंद अभिलेखात तीन्ही आपत्याची नोंद आहे.
गावातील नागरिकांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली असता त्यांनी अनेकदा गावक-यांवर सुद्धा फसवणूक करून तक्रार केली आहे तसेच गावातील नागरिकांचे वेळेवर काम करत नाही. त्यांना धमकी देत असतात. असे सुद्धा गावातील नागरिकांनी माहिती दिली आहे.त्यांच्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक प्रमाणपत्रापासून वंचित रहावे लागत आहे असे त्यांनी वार्ताहर यांना सांगितले आहे. त्यामुळे अश्या प्रकरणामुळे बरी होण्यासाठी त्यांना तसेच गावातील नागरिकांना न्याय मिळावे या साठी प्रशासनाला तात्काळ चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणावर कार्यवाही न झाल्यास व गावक-यांची मागणी पुर्ण न झाल्यावर रस्त्यावर येउन आंदोलन करण्याचे तसेच उच्च स्तरावर कार्यवाही करण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.





