33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय ओबीसी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांचे 03 तारखेला गोंदियात आगमन

ओबीसी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांचे 03 तारखेला गोंदियात आगमन

0
47

गोंदिया,दि.30ः-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेश् अध्यक्ष भानुदास माळी व आमदार अड़. अभिजीत वंजारी हे गोंदिया जिल्हा दौऱ्यावर ०3.०८.२०२१ ला दुपारी 11:00 वाजता शहीद भोला कॉंग्रेस भवन गोंदिया येथे येत असून ओबीसी मेळाव्याला सम्बोधित करणार आहेत तरी ओबीसी विभागचे सर्व पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०3/०८/२०२१ रोज मंगलवार शहीद भोला कॉंग्रेस भवन येथे दुपारी 11:00 वाजता सभा आयोजीत केली आहे. तरी या बैठकीला सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, व ओबीसी विभाग, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, महिला कॉंग्रेस, किसान कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, एन एस यु आय, सेवा दल, अल्पसंख्यक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेवरावजी किरसान, जिल्हा ओबीसी कॉंग्रेस चे अध्यक्ष जीतेन्द्र कटरे, जिल्हा ओबीसी कॉंग्रेस चे सचिव अजय रहाँगडाले यांनी केले आहे.

blank