
अर्जुनी मोरगाव,दि.01 :–राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यकांची संघटना त्यांच्या विविध मागण्या स्तव 15 जून 2021 पासून आंदोलनात उतरलेली असून जून पर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्याने संघटनेने 1 ऑगस्ट 2021 पासून गोंदिया जिल्ह्यातील सर्व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक तसेच खाजगी पशुसेवा देणारे सर्व खाजगी डिप्लोमाधारक पशुवैद्यकानी बेमुदत संपावर जात असल्याबाबत शासनाला नोटीस दिलेली आहे. त्याअनुषंगाने शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन आयोजित केले आहे त्या अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया समोर दिनांक 2 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे सर्व शासकीय व खाजगी डिप्लोमा धारक पशुवैद्यक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर परवेज सय्यद, डॉक्टर डोंगरवार ,डॉक्टर मुळे, डॉक्टर डेकाटे ,डॉक्टर राठोड, डॉक्टर यशवंत वाघाये यांनी केले आहे. धरणे आंदोलनानंतर तीन ऑगस्ट 2021 पासून सर्व तालुक्याच्या ठिकाणी मागण्या मान्य होईपर्यंत धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे बेमुदत संप कालावधीमधे शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या होणाऱ्या हानिस सर्वस्वी पशुसंवर्धन खाते जबाबदार राहील. असे संघटनेच्या पदाधिकारी यांनी शासनास लेखी निवेदनाद्वारे अवगत केले आहे.





