38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ अंगणवाडी सेविकांच्या मागण्यासाठी 9 आँगस्टला जि.प.समोर आंदोलन

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यासाठी 9 आँगस्टला जि.प.समोर आंदोलन

0
62

गोंदिया,दि.03ः- अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी 9 आँगस्ट रोजी जिल्हा परिषद समोर अंगणवाडी कर्मचार्‍यांच्यावतीने त्यांना देण्यात आलेल्या निकृष्ठ दर्जाच्या मोबाईलची प्रतिकात्मक अन्त्ययात्रा काढून शासनाचे लक्ष वेधत आंदोलन करण्यात येणार आहे.

शासनाने 16 पर्यत योग्य निर्णय न घेतल्यास 17 पासून राज्यव्यापी मोबाईल वापसी आंदोलन व पोषण ट्रॅकर कामबंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. शासनाने दिलेल्या जुन्या मोबाईलची सध्याची परिस्थिती फार वाईट आहे. त्याची वॉरंटी संपली आहे. हँग होतो, गरम होतो, बंद पडतो. नादुरुस्त होतो. दुरुस्तीचा खर्च प्रचंड असून तो खर्च अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून वसूल केला जातो. त्यात नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्याची क्षमता कमी असल्याने अनेक अचडणी येत असल्याचे आयटक व अंगणवाडी कृती समितीने शासनाला वेळोवेळी निवेदनच्या माध्यमातून कळवले.परंतु, त्याची दखल घेतली गेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्विकारण्यात आले आहे. आंदोलनातून शासनाने दिलेले हे सर्व जुने मोबाईल परत घ्या व नवीन, चांगल्या दर्जाचे व क्षमतेचे आधुनिक मोबाईल देण्यात यावे, अ‍ॅप संपूर्णपणे मराठी करून त्यातील सर्व त्रुटी दूर करण्यात यावे अन्यथा तो अ‍ॅप रद्द करण्यात यावा, मोबाईलचे वाढलेले काम पाहता या भत्यात वाढ करावी, रिक्त जागांवर ताबडतोब भरती करण्यात आदी मागण्यासांठी आयोजित या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयटकचे राज्य उपाध्यक्ष काॅ हौसलाल रहांगडाले,जिल्हा अध्यक्ष शकुंतला फटींग,जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे,जीवनकला वैद्य,पौर्णीमा चुटे,विठा पवार,पंचशिला शहारे,जयकुवर मच्छरके,सुनिता मंलगाम, विना गौतम, भुमेश्वरी राहंगडाले, अंजना ठाकरे, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, बिजुला तिडके, दुर्गा संतापे, मिनाक्षी पटले,पुष्पा भगत, सुनिता शिवनकर, काचंन शहारे, ज्योति लिल्हारे आदी सेविका, मदतनिस यांनी केले आहे.

blank