31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता तिरोडा-खैरलांजी मार्गावर अपघात : चालक जागीच ठार

तिरोडा-खैरलांजी मार्गावर अपघात : चालक जागीच ठार

0
43

blank

तिरोडा, दि.6 : तिरोडा-खैरलांजी मार्गावरील भुराटोला येथील नाल्यावर भरधाव वेगाने असलेल्या मोटारसायकलचा जोरदार अपघात होवून चालक जागीच ठार झाला. हा अपघात आज शुक्रवार, सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडला. देवेंद्र धुरन राऊत (वय 45) रा. इंदोरा बु. असे मृतकाचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की, इंदोरा बु. येथील देवेंद्र राऊत हा मोटार सायकलने (एमएच 35/क्यू-3741) आपल्या मित्राला तिरोडा येथे सोडण्यासाठी गेला होता. तिरोड्यावरून आपल्या गावाकडे परत येत असताना मोटारसायकल भरधाव वेगात असल्याने संतुलन बिघडले. दरम्यान भुराटोला येथील नाल्याजवळ रस्त्याच्या बाजूला दगडावर जावून मोटारसायकल आदळली. चालक देवेंद्रचा डोका सुद्धा दगडावर आदळला. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.सदर अपघाताची माहिती मिळताच तिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले. फिर्यादी दिलीप रंगलाल आंबेडारे रा. इंदोरा बु. यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस शिपाई सनोज सपाटे करीत आहे.