
– वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
अहेरी- राज्यात प्रसिद्ध असलेल्या एकमेव शासकीय हत्ती कॅम्प कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा दुपारच्या सुमारास हत्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभाग तसेच वन्यजीव प्रेमीमध्ये खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव “अर्जुन” असून तो दिड वर्षाचा होता .त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ठ नसले तरी एकाच आठवड्यात लागोपाठ दोन हत्तीच्या झालेल्या मृत्यूमुळे हत्ती कॅम्पमधील हत्तीच्या देखभाली व वनविभागाच्या कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘आदित्य’ नावाच्या हत्तीचा २९ जून २०२० ला अवघ्या चवथ्या वर्षी मृत्यू झाला होता. ११ जून २०२० रोजी जवळील तलावातील गाळात आदित्य फसल्याने त्याची प्रकृती बिघडली त्यानंतर वन विभागाने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे पाईपलाईनचा खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी कमलापूर वनपरिक्षेत्राच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असले तरी . कुठल्याही कर्मचारी वर कारवाई झाली नसल्याने दुर्लक्षित करण्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे . तर ३ ऑगस्ट रोजी ‘सई’ नावाच्या दोन वर्ष आठ महिने हत्तीचा मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असताना आणखी आज एका हत्तीचा मृत्यू झाल्याने आता सिरोंचा वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. सिरोंचा वन विभागाचे अधिकारी आतातरी जागे होवून वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करनार याकडे वन्यजीवप्रेमींनी लक्ष वेधले आहे.





