
गडचिरोली दि 07-ट्रायफेड च्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त आज 6 ऑगस्ट रोजी माविम जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत स्थापन केलेल्या वैरागड येथील जीवनज्योती लोक संचालित साधन केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार तर धानोरा येथील दीपज्योती सीएमआरसी ला चार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाने डिजिटल सोहळा आयोजित केला होता.
वैरागड येथील जीवनज्योती लोक संचालित साधन केंद्राद्वारे स्थापन करण्यात आलेल्या वनधन विकास केंद्र, वैरागड यांना मोहा सँनिटायझर निर्मीती करीता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर दीपज्योती सीएमआरसी धानोरा द्वारे स्थापन करण्यात आलेल्या वनधन विकास केंद्र धानोरा यांना विविध कार्यासाठी चार राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले. यावेळी ट्रायबल अफेअर्स चे केन्द्रीय मंत्री अर्जून मुंडा व ट्रायबल अफेअर्सचे राज्यमंत्री रेणुका सिंग व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार जाहीर करण्यात आले. तसेच याप्रसंगी महाराष्ट्रातील वनधन योजना विषयी माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांनी आपले आभिप्राय नोंदविले. तर सीएमआरसीच्या वतीने दीपज्योती सीएम आरती धानोरा येथील व्यवस्थापक रसिका मारगाये यांनी आपले मत प्रदर्शित केले.





